Ad will apear here
Next
पुरुषांसाठीच्या तयार कपड्यांचा ‘टायझर’ ब्रँड दाखल
‘टायझर’  ब्रँडची घोषणा करताना कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी व संचालक कुणाल मराठे आणि कंपनीचे संचालक के. बी. गायकवाड
पुणे : ‘कॉटनकिंग’ आणि ‘लिननकिंग’ या ब्रँडसच्या निर्मात्यांनी आता ‘टायझर’ हा खास पुरुषांसाठीच्या तयार कपड्यांचा नवीन ब्रँड बाजारात सादर केला आहे. सर्वसामान्य ग्राहकाला परवडणाऱ्या किंमतीत तयार कपडे उपलब्ध करण्याच्या हेतूने कंपनीने हा ब्रँड सादर केला असून पुण्यासह राज्यातील ३० पेक्षा अधिक दालनांच्या माध्यमातून हे  कपडे उपलब्ध होणार असल्याची घोषणा कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संचालक कुणाल मराठे यांनी नुकतीच पत्रकार परिषदेत केली. या वेळी कंपनीचे संचालक के. बी. गायकवाड हे देखील उपस्थित होते. 
 
‘टायझर’ ब्रँड विषयी अधिक माहिती देताना कुणाल मराठे म्हणाले, ‘सर्वसामान्य ग्राहकाला परवडणाऱ्या किंमतीत तयार कपड्यांचा कोणताही ब्रँड सुयोग्य पद्धतीने कार्यरत असल्याचे फारसे दिसत नाही. जे ब्रँड आहेत त्यांच्याकडून ग्राहकांना विश्वासार्ह्य उत्पादने आणि सेवा मिळत नाही. नेमकी हीच बाब लक्षात घेऊन आम्ही एस. पी. लाईफस्टाईल ब्रँडस् प्रा. लि. च्या वतीने ही पुरुषांसाठीची तयार कपड्यांची श्रेणी बाजारात आणत आहोत. या श्रेणी अंतर्गत पुरूषांसाठीच्या विविध प्रकारच्या तयार कपड्यांचे अनेक पर्याय ग्राहकांना फक्त खास अशा ‘टायझर’ दालनातच मिळतील. ज्यामध्ये उच्च दर्जाचे तयार कपडे रास्त दरात उपलब्ध असतील. याबरोबरच या विशेष दालनांमध्ये कपडे खरेदीचा आनंददायी अनुभव देखील ग्राहकांना मिळेल.’
 
‘सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे या उत्पादनात खरेदी केल्यापासून एका वर्षापर्यंत कोणतीही उत्पादन त्रुटी आढळल्यास ते कपडे विनाअट व कोणतेही अतिरिक्त शुल्क न घेता बदलून दिले जातील. ज्यामुळे आमच्या उत्पादनाच्या दर्जा विषयीची कटिबद्धता अधोरेखित होते’, असे मराठे यांनी नमूद केले.    
 
‘टायझर’ची ही दालने सध्या पुणे, कोल्हापूर, सोलापूर, औरंगाबाद, नाशिक, नागपूर आदी विभागांमध्ये सुरु होत आहेत. या श्रेणीतील उत्पादने अत्यंत किफायतशीर दरात उपलब्ध आहेत. या श्रेणीतील शर्टची   किंमत   ४९५ ते   ६९५ रुपये , ट्राउझर  किंमत रु. ५९५ ते रु. ७९५ , टी   शर्ट  किंमत रू. १९५ पासून पुढे  आणि जीन्स  किंमत रु. ६९५ ते रु. ९९५  उपलब्ध असतील, असेही यावेळी सांगण्यात आले.
 
‘या  कपड्यांच्या निर्मितीमध्ये ब्लेंडेड फॅब्रीकचा वापर करण्यात येत असून   बारामती येथे उत्पादन प्रकल्प उभारण्यात आला आहे. प्रकल्पाची सध्याची उत्पादन क्षमता ही प्रतिदिन १ हजार शर्टस् आणि ५०० ट्राऊझर बनविण्याची आहे. येत्या एक वर्षात दालनांची संख्या तिपटीने वाढवून १०० पर्यंत नेण्याची कंपनीची योजना आहे. त्यानुसार टप्प्याटप्प्याने उत्पादन क्षमतेमध्ये देखील वाढ करण्यात येईल.  यासाठी सुमारे १२ कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे’, असेही कुणाल मराठे यांनी सांगितले.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/ZZJMBF
Similar Posts
बंदिशी, भैरवीने आनंदली रविवारची सायंकाळ पुणे : संतूरवर हळुवार छेडलेल्या तारा... त्यातून उमटलेले मधुर स्वर... विलंबित बंदिशीने गाठलेली उंची... मारवा रागात आलाप, जोड, झाला यामधून झालेले पंडित राहुल शर्मा यांचे सादरीकरण... त्यानंतर कल्याण, बिहाग रागात पंडित व्यंकटेशकुमार यांच्या बंदिशींनी संगीतप्रेमींची रविवारची (चार फेब्रुवारी) सायंकाळ आनंददायी ठरली
साहित्य संमेलनाचा सीएसआर उपक्रम पुणे : पुण्यामध्ये येत्या रविवारी २८ जानेवारी रोजी ‘यात्रा परिक्रमा साहित्य संमेलन’ आयोजित करण्यात आले आहे. साहसी अध्यात्मिक यात्रा परिक्रमा आणि त्यातून निर्माण झालेले साहित्य, त्यांची विक्रमी विक्री यातून सुरू झालेले विविध सामाजिक, सांस्कृतिक, पर्यावरण विषयक, लोकजीवन आणि ग्रामीण शहरी जीवनशैलीचा समन्वय
‘संशोधनात महिलांचा सहभाग वाढावा’ पुणे : ‘संशोधन क्षेत्रात पुरुषांच्या तुलनेत महिलांचे प्रमाण अतिशय कमी आहे. यामुळे आता होणारे संशोधन हे शास्त्रीयदृष्टया योग्य असले, तरी ते एकांगी पद्धतीचे आहे. विविध प्रकारच्या संशोधनांमध्ये महिलांचा सहभाग वाढला तर संशोधनाचे स्वरूप बदलेल,’ असे मत जीवशास्त्र विषयातील ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च’च्या (आयसर) शास्त्रज्ञ डॉ
‘शिखर फाऊंडेशन’ कडून स्टोक-कांगरी शिखर सर पुणे : सह्याद्रीच्या डोंगर रांगेतील हरिश्चंद्रगडचा कोकण कडा, नागफणी, नानाचा अंगठा, मोरोशीचा भैरावगड, माहुलीचा बाण, नवरा-नवरी अशा अनेक सुळक्यांवर यशस्वी चढाया करणाऱ्या तसेच नाशिक त्रिंबकेश्वर पासून ते आंबोली पर्यंतच्या साह्यवाटा आणि गडकिल्ल्यांच्या यशस्वी मोहीमा राबवून तरुण पिढीला  गिर्यारोहण क्षेत्रामध्ये

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language